दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी 'जागतिक आयोडीन कमतरता दिन (World Iodine Deficiency Day)' जगभरात साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • या दिवसाला 'जागतिक आयोडीन कमतरता विकार प्रतिबंध दिन (Global Iodine Deficiency Disorders Prevention Day)' म्हणूनही ओळखले जाते.
  • हा दिवस मुख्यतः आयोडीनच्या कमतरतेबद्दल, त्याचे आरोग्यावरील परिणाम तसेच पुरेसे आयोडीन सेवन करण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • WHO आणि UNICEF यांच्या पाठिंब्याने १९९० मध्ये मुलांसाठीच्या जागतिक शिखर परिषदेत आयोडीनची कमतरता दूर करण्याच्या जागतिक प्रयत्नांना गती मिळाली होती.
  • याला अधिकृतपणे २००२ मध्ये जागतिक आयोडीन कमतरता दिन म्हणून घोषित करण्यात आले होते.