दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात 'पोलीस स्मृती दिन (Police Commemoration Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाऱ्या पोलीस जवानांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात हा दिवस पाळला जातो
- २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील 'हॉट स्प्रिंग्स' येथे चिनी सैन्यासोबतच्या झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या १० पोलीस जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
- श्री. अमित शहा (केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री) यांनी नवी दिल्ली येथील 'राष्ट्रीय पोलीस स्मारकावर (National Police Memorial)' शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेत जानेवारी १९६० मध्ये '२१ ऑक्टोबर' हा दिवस 'पोलीस स्मृती दिन' म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
- १९६० साली पहिल्यांदा हा दिवस पाळण्यात आला होता.