संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी 'जागतिक दूरदर्शन दिन (World Television Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- शिक्षण तसेच माहिती प्रसार क्षेत्रात दूरदर्शनचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ३० वी आवृत्ती साजरी केली जात आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १७ डिसेंबर १९९६ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून दरवर्षी २१ नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक दूरदर्शन दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले होते.
- हा दिवस पहिल्यांदा २१ नोव्हेंबर १९९७ रोजी साजरा करण्यात आला होता.
- २१ नोव्हेंबर १९९६ रोजी न्यूयॉर्क, अमेरिका येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 'जागतिक दूरदर्शन मंचाची (World Television Forum)' सुरुवात झाली होती.
- याच तारखेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.