जगभरात दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (World Senior Citizens Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे या मुख्य उद्देशासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचे योगदान आणि त्यांच्या जीवनातील अनुभव यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
- ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, आरोग्यसेवा, सामाजिक सहभाग, भावनिक स्वास्थ्य, सुलभता आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित हा सदर दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.
- जगभरात वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढत असताना हा दिवस वृद्धांना आधार देण्याच्या गरजेची नोंद करून देतानाच ही केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाचीही जबाबदारी आहे हे प्रकर्षाने मनावर बिंबवतो.