-
भारतात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यावर्षी २० ऑगस्ट २०२० रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ७६ वी जयंती साजरी होत आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमार्फत राजीव गांधी यांच्या मृत्यूपश्चात १ वर्षानंतर १९९२ मध्ये राजीव गांधी सद्भावना पुरस्कार स्थापन करण्यात आला होता.
-
देशभरात दरवर्षी हा दिवस वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले दिवंगत राजीव गांधी यांचा स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
राजीव गांधींबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राजीव गांधी हे त्यांची आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर वयाच्या ४० व्या वर्षी भारताचे पंतप्रधान बनले.
-
१९८४-८९ या कालावधीत त्यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला होता.
-
शिक्षण पद्धतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी १९८६ सालामध्ये त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले होते
-
शैक्षणिक धोरणाची परिणती म्हणून जवाहर नवोदय विद्यालय प्रणाली स्थापन करण्यात आली जिथे त्यांनी ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे मोफत निवासी शिक्षण देण्याची सोय केली.
-
१९८६ मधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, परवाना राज कमी करणे आणि त्यात पंचायती राज चा समावेश करणे अशी उल्लेखनीय कार्ये त्यांनी पार पाडली.