• भारतात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'भारतीय अक्षय ऊर्जा दिन' किंवा 'नवीकरणयोग्य ऊर्जा दिन' साजरा करण्यात येतो. भारतीय अक्षय ऊर्जेद्वारे भारतातील अक्षय ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व लक्षात घेतले जाते. जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

ठळक मुद्दे

  • भारत सरकारला देशातील प्रत्येक राज्यास शाश्वत स्वरूपातील टिकाऊ ऊर्जा प्रदान करण्यासाठी विकासाचे किंवा नवीकरणयोग्य ऊर्जा स्त्रोतांचे महत्व ज्ञात आहे.

  • सदर विषयासंदर्भात दुर्लक्ष करणाऱ्या लोकांमध्ये नूतनीकरण करण्यायोग्य स्त्रोतांविषयी जागरूकता वाढविणे अगत्याचे आणि तितकेच महत्वपूर्ण आहे.

भारतीय अक्षय ऊर्जा दिनाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी अक्षय ऊर्जा विकास कार्यक्रमांना समर्थन देण्याकरिता आणि त्याचा उपयोग करण्याकरिता २००४ सालामध्ये भारतीय अक्षय ऊर्जा दिनाची स्थापना करण्यात आली होती.

  • सर्वप्रथम आयोजन ठिकाण: नवी दिल्ली येथे अक्षय ऊर्जा दिनाशी संबंधित सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • विशेष घटना: २००४ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात १२००० शालेय मुलांनी अक्षय ऊर्जेला चालना देऊन जागरूकता वाढवण्यासाठी मानवी साखळी तयार केली होती.

  • दिवस महत्व विशेष: भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २० ऑगस्ट ही त्यांची जन्म तारीख भारतीय अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरी करण्यात येते.