• फ्रेंच टेनिसपटू गेल मॉनफिल्सने २०२२ 'अ‍ॅडलेड आंतरराष्ट्रीय (Adelaide International)' १ च्या पुरुष एकेरीच्या स्पर्धेत कारकिर्दीतील ११ वे ATP विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे

  • रशियाच्या कॅरेन खाचानोव्हचा पराभव करून त्याने सदर विजेतेपद पटकाविले आहे.

  • महिलांच्या गटात ऑस्ट्रेलियन स्टार अ‍ॅश्ले बार्टीने आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले आहे.

विजेत्यांची यादी

  • पुरुष एकेरी: गेल मॉनफिल्स (फ्रान्स)

  • महिला एकेरी: अ‍ॅश्ले बार्टी (ऑस्ट्रेलिया)

  • पुरुष दुहेरी: रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन (भारत)

  • महिला दुहेरी: अ‍ॅश्ले बार्टी आणि स्टॉर्म सँडर्स (ऑस्ट्रेलिया)