• २०२२ ची पहिली BRICS शेर्पा बैठक नुकतीच चीनच्या अध्यक्षतेखाली आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आली होती.

ठळक मुद्दे

  • सदस्यांनी २०२१ मध्ये BRICS अध्यक्षपदासाठी भारताचे आभार मानले होते.

  • २०२२ मध्ये चीनने BRICS चे फिरते अध्यक्षपद स्वीकारले आहे.

ब्रिक्सबाबत (BRICS) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BRICS म्हणजेच Brazil, Russia, India, China, and South Africa अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका होय.

  • स्थापना वर्ष: २००९ साली BRICS ची स्थापना करण्यात आली होती.