-
'जागतिक आर्थिक मंचाची (World Economic Forum - WEF)' वार्षिक 'शाश्वत विकास प्रभाव शिखर परिषद (Sustainable Development Impact Summit)' २०-२३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये संपन्न होणार आहे.
ठळक मुद्दे
-
यंदाचा सर्वसमावेशक कार्यक्रम अर्थव्यवस्थांचे पुनरुज्जीवन करण्यावर भर देईल अशी अपेक्षा आहे.
-
'समान, सर्वसमावेशक आणि शाश्वत पुनर्प्राप्तीला आकार देणे (Shaping an Equitable, Inclusive and Sustainable Recovery)' या थीम अंतर्गत सदर शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.
WEF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: WEF म्हणजेच World Economic Forum अर्थात जागतिक आर्थिक मंच होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: कोलोनी, स्वित्झर्लंड हे WEF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
संस्थापक: क्लाऊस स्वाब हे WEF चे संस्थापक आहेत.
-
स्थापना वर्ष: जानेवारी १९७१ मध्ये WEF ची स्थापना करण्यात आली होती.