-
नुकतेच २०२१ सालाचे रसायनशास्त्र मधील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड डब्ल्यू. सी. मॅकमिलन यांना जाहीर करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'असममित ऑर्गोनोकॅटालिसिसच्या विकासासाठी (for the development of asymmetric organocatalysis)' सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसमार्फत २०२१ सालाचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेंजामिन लिस्ट यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
त्यांचा जन्म १९६८ मध्ये जर्मनी मधील फ्रँकफर्ट येथे झाला होता.
-
१९९७ गोएथे विद्यापीठ फ्रँकफर्ट, जर्मनी मधून त्यांनी आपली पीएच. डी. पूर्ण केली होती.
डेव्हिड डब्ल्यू. सी. मॅकमिलन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
त्यांचा जन्म १९६८ मध्ये बेलशिल, यूके येथे झाला होता.
-
कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन, यूएसए मधून त्यांनी १९९६ मध्ये पीएच. डी. पूर्ण केली होती.