• २०२१ सालासाठीचे शरीरशास्त्र (Physiology) किंवा वैद्यकशास्त्रातील (Medicine) नोबेल पारितोषिक संयुक्तपणे डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पटापौटियन यांना जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'तापमान आणि स्पर्शासाठी रिसेप्टर्सच्या शोधासाठी (Discoveries of receptors for temperature and touch)' त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • विजेत्यांनी आपल्या संवेदना तसेच पर्यावरण यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंवादाच्या बाजू समजून घेण्यासाठी दुवे ओळखले आहेत.

डेव्हिड ज्युलियस यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • ते कॅलिफोर्निया विद्यापीठात कार्यरत आहेत.

  • त्यांनी उष्णतेला प्रतिसाद देणाऱ्या त्वचेच्या मज्जातंतूंच्या शेवटच्या भागातील सेन्सर ओळखण्यासाठी मिरच्यांमधील एक तीव्र संयुग कॅप्सासिनचा वापर केला आहे.

आर्डेम पटापौटियन यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • 'स्क्रिप्स रिसर्च येथील हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये (Howard Hughes Medical Institute at Scripps Research)' ते कार्यरत आहेत.