• डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गुईडो इम्बेन्स यांना २०२१ सालचे 'आर्थिक विज्ञान (Economic Sciences)' मधील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • 'रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्समार्फत (Royal Swedish Academy of Sciences)' डेव्हिड कार्ड यांना 'श्रम अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानासाठी (for his empirical contributions to labor economics)' निवडण्यात आले आहे.

  • कार्ड हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले, यूएसए (University of California, Berkeley, USA) येथे कार्यरत आहेत.

  • जोशुआ अँग्रिस्ट हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, केंब्रिज, यूएसए येथे तर गुईडो इम्बेन्स हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यूएसए येथे कार्यरत आहेत.

  • अँग्रिस्ट आणि गुईडो इम्बेन्स यांना संयुक्तपणे 'कारक संबंधांच्या विश्लेषणासाठी त्यांच्या पद्धतशीर योगदानासाठी (for their methodological contributions to the analysis of causal relationships)' निवडण्यात आले आहे.