• केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन मेळा (National Horticulture Fair - NHF) २०२१ चे उद्घाटन व्हर्च्युअल पद्धतीने बंगळुरु येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ५ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बागायती संशोधन संस्थेमार्फत (Indian Institute of Horticultural Research - IIHR) बंगळुरुमध्ये करण्यात आले आहे.

  • ‘स्टार्ट-अप आणि स्टँड-अप इंडियासाठी फलोत्पादन (Horticulture for Start-Up and Stand-Up India)’ ही NHF २०२१ ची थीम आहे.