• केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी 'सुशासन दिनानिमित्त (Good Governance Day)' अनावरण करण्यात आलेल्या २०२१ सालच्या 'सुशासन निर्देशांकामध्ये (Good Governance Index)' गुजरात अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर निर्देशांक क्रमवारी 'प्रशासन सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागामार्फत (Department of Administration Reforms and Public Grievances - DARPG)' तयार करण्यात आली आहे.

  • केंद्र तसेच राज्य सरकारांद्वारे घेतलेल्या विविध हस्तक्षेपांच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी राज्यांमध्ये समान रीतीने वापरण्यायोग्य साधन तयार करणे हे या निर्देशांकाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.