• सिडनीस्थित 'इन्स्टिटयूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (Institute for Economics and Peace - IEP)' तर्फे 'जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index - GPI)' ची १५ वी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'जागतिक शांतता निर्देशांक' हे जागतिक शांततेचे जगातील अग्रगण्य मानक आहे.

  • सदर निर्देशांक १६३ स्वतंत्र राज्ये आणि प्रांत यांची क्रमवारी निर्देशित करतो.

देश क्रमवारी

  • २००८ सालापासून आईसलँड जगातील सर्वात शांत देश म्हणून अव्वल स्थानावर विराजमान आहे.

  • आईसलँडनंतर डेन्मार्क, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया सारखे इतर देश या यादीत सामील आहेत.

  • सलग चौथ्या वर्षी अफगाणिस्तान पुन्हा सर्वात कमी शांततापूर्ण देश म्हणून चर्चेत राहिला आहे.

  • अफगाणिस्ताननंतर येमेन, सिरिया, दक्षिण सुदान आणि इराक हे देश आहेत.

भारत आणि शेजारी देश स्थिती

  • भारत जागतिक क्रमवारीत १३५ व्या स्थानावर तर दक्षिण आशिया प्रदेशात ५ वा सर्वात शांततापूर्ण देश ठरला आहे.

  • भूतान आणि नेपाळ या प्रदेशातील प्रथम आणि द्वितीय सर्वात शांततापूर्ण देश ठरले आहेत.

  • बांगलादेश दक्षिण आशियात तिसऱ्या क्रमांकावर तर जागतिक स्तरावर ९१ व्या स्थानावर आहे.

  • श्रीलंका जगात ९५ व्या स्थानावर तर दक्षिण आशिया प्रदेशात चौथ्या स्थानावर आहे.

  • पाकिस्तान जगभरात १५० व्या आणि दक्षिण आशिया प्रदेशात ६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.