-
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या २०२१ सालच्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये (Economic Freedom Index) सिंगापूर अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
अमेरिकन विचार गट असलेल्या हेरिटेज फाउंडेशनमार्फत अलिकडेच 'आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकाचे' अनावरण करण्यात आले आहे.
-
जुलै २०१९ ते जून २०२० या कालावधीत १८४ देशांचा समावेश करुन सदर निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
क्रमवारी विशेष
-
सदर निर्देशांकात सिंगापूरने सलग दुसर्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले आहे.
-
भारताने या यादीत १२१ वे स्थान मिळवले आहे.
-
४० आशिया-पॅसिफिक देशांमध्ये भारत २६ व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
क्रमवारी
-
१. सिंगापूर
-
२. न्यूझीलंड
-
३. ऑस्ट्रेलिया
-
४. स्वित्झर्लंड
-
५. आयर्लंड
-
१२१. भारत