• राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीमार्फत भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान 'राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, २०२०' साठी ४ खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या या ४ खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मणिका बत्रा आणि पॅरालंपियन खेळाडू एम. थंगवेलू यांचा समावेश आहे.

  • कोविड - १९ मुळे या वर्षाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा व्हर्च्युअली आयोजित केला जाऊ शकतो.

  • सदर पुरस्कार मिळवणारा रोहित शर्मा हा सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्यानंतर चौथा क्रिकेटपटू असेल.

  • सचिन तेंडुलकरला १९९८ मध्ये, धोनीला २००७ मध्ये तर कोहलीला २०१८ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार प्राप्त झाला होता.

राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९९१-९२ सालामध्ये हा पुरस्कार स्थापन करण्यात आला होता.

  • प्रथम पुरस्कार मानकरी: बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला होता.

  • पुरस्कार बक्षीस: खेलरत्न पुरस्कार विजेत्यास ७.५ लाख रुपयांचे बक्षीस मिळते.

  • पुरस्कार प्रदान करण्याचे स्वरूप: आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार इ. पुरस्कारांचा यांचा समावेश होतो.

  • दरवर्षी २९ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार राष्ट्रपती भवनात वितरित करण्यात येतो.

  • 'हॉकीचे जादूगार' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिवशी म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो.