• १९६६ पासून दरवर्षी २० जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन (International Chess Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे

  • बुद्धीबळ हा ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात प्राचीन तसेच लोकप्रिय खेळांपैकी एक म्हणून खेळला जातो.

  • सदर खेळाच्या माध्यमातून संलग्न देशांमध्ये समानता, परस्पर आदर तसेच समजूतदारपणा वाढविण्याचे महत्वपूर्ण कार्य पार पाडण्यात येते.

  • 'आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाची स्थापना (International Chess Federation - FIDE)' २० जुलै १९२४ रोजी झाली होती.

  • सदर दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना युनेस्कोमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती.