संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी २० सप्टेंबर रोजी 'जागतिक स्वच्छता दिन (World Cleanup Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • स्वच्छता उपक्रम आणि शाश्वत विकासातील त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने संयुक्त राष्ट्र दरवर्षी २० सप्टेंबर रोजी 'जागतिक स्वच्छता दिन' साजरा करते.
  • २०२६ ची या संकल्पना: 'स्वच्छ ताटं ते स्वच्छ शहरे (From Clean Plates to Clean Cities)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • संयुक्त राष्ट्र आमसभेमार्फत ८ डिसेंबर २०२४ रोजी ठराव स्वीकारत दरवर्षी २० सप्टेंबर हा दिवस 'जागतिक स्वच्छता दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • सर्वप्रथम १८ सप्टेंबर २०२४ रोजी जागतिक स्वच्छता दिन साजरा करण्यात आला होता.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.