दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (World Osteoporosis Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- ऑस्टिओपोरोसिस (हाडांचा ठिसूळपणा) आणि हाडांशी संबंधित इतर चयापचय (Metabolic) आजारांच्या प्रतिबंधाबाबत तसेच त्यांच्या निदान आणि उपचारांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- यंदाची २०२६ सालची या दिवसाची ३१ वी आवृत्ती आहे.
- २०२६ ची संकल्पना/ थीम(Theme): 'आयुष्यभरासाठी तुमची हाडे घडवा, त्यांचे रक्षण करा आणि त्यांना बळकट करा (Build, Protect, Strengthen Your Bones for Life)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- युनायटेड किंगडमच्या 'नॅशनल ऑस्टिओपोरोसिस सोसायटी'द्वारे युरोपियन कमिशनच्या सहकार्याने या दिवसाची सुरुवात १९९६ मध्ये करण्यात आली होती.
- २० ऑक्टोबर १९९६ रोजी हा दिवस पहिल्यांदा पाळण्यात आला होता.