संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी २० नोव्हेंबर रोजी 'जागतिक बाल दिन (World Children’s Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- जगभरात एकता वाढवणे, मुलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या कल्याणात सुधारणा करणे या मुख्य उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- २०२६ ची या दिवसाची संकल्पना/ थीम (Theme): 'माझा दिवस. माझे हक्क. माझे भविष्य. (My Day. My Rights. My Future.)' ही या दिवसाची २०२६ सालची संकल्पना आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १४ डिसेंबर १९५४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत ठराव स्वीकारला जाऊन १९५६ पासून जगभरात हा दिवस साजरा करण्याची शिफारस करण्यात आली होती.
- २० नोव्हेंबरचे या तारखेला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतर्फे १९५९ मध्ये 'बाल हक्क घोषणापत्र' तर १९८९ मध्ये 'बाल हक्क करार' स्वीकारले गेले होते.