जगभरात दरवर्षी २० ऑगस्ट रोजी 'जागतिक डास दिन' (World Mosquito Day - WMD) पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- १८९७ मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी हे सिद्ध केले होते की मादी ॲनोफिलीस डास मानवांमध्ये मलेरियाचा प्रसार करतात.
- त्यांनी लावलेल्या या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
- २० ऑगस्ट १८९७ रोजी भारतातील सिकंदराबाद (तेलंगणा) येथे सर रोनाल्ड रॉस यांनी मादी ॲनोफिलीस डासांच्या पोटात मलेरियाचे परजीवी शोधून काढले होते.
- १८ डिसेंबर १८९७ रोजी त्यांचे निष्कर्ष 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' (BMJ) मध्ये शोधनिबंधाद्वारे प्रकाशित करण्यात आले होते.
- १९०२ मध्ये रॉस यांना शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- मलेरियावरील संशोधनासाठी हा सन्मान मिळवणारे ते पहिले ब्रिटिश नागरिक ठरले होते.