दरवर्षी २० ऑगस्ट रोजी भारतात राजीव गांधी यांच्या जयंतीदिवशी 'सद्भावना दिवस (Harmony Day)' साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • विविध धर्म आणि समुदायांमध्ये शांतता, एकता आणि सलोखा वाढीस लावणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • सदर दिवस हा भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती म्हणूनही साजरा करण्यात येतो. 
  • यंदाची राजीव गांधी यांची ही ८२ वी जयंती आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २० ऑगस्ट १९९२ रोजी पहिल्यांदा सद्भावना दिवस साजरा करण्यात आला होता.