दरवर्षी २ सप्टेंबर रोजी 'जागतिक नारळ दिन (World Coconut Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- नारळाचे जगभरातील शेती, पोषण तसेच उपजीविकेमध्ये महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
- २०२६ ची थीम/संकल्पना: 'अनिश्चिततेच्या काळात नारळ: अन्न, ऊर्जा आणि उपजीविकेची सुरक्षा (Coconuts in Times of Uncertainty: Securing Food, Energy, and Livelihoods)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- सध्याच्या 'इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी'मार्फत (जी आधी 'आशिया आणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी' म्हणून ओळखली जात होती) जागतिक नारळ दिनाची सुरुवात करण्यात आली होती.
- पहिल्यांदा २००९ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला होता.