संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (International Day of Non-Violence)' पाळण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी प्रस्थापित केलेल्या शांतता आणि अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा सन्मान करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' पाळला जातो.
  • देशभरात हा दिवस 'गांधी जयंती' म्हणून साजरा केला जातो.
  • यंदा २०२६ साली महात्मा गांधींची १५७ वी जयंती तसेच २० वा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्यात आला आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • नोबेल विजेत्या शिरीन एबादी यांच्या प्रस्तावानंतर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमार्फत २००७ मध्ये ठरावाद्वारे आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाची स्थापना करण्यात आली होती.
  • २ ऑक्टोबर २००७ रोजी हा दिवस सर्वप्रथम पाळण्यात आला होता.
  • भारतात २ ऑक्टोबर हा दिवस 'गांधी जयंती' तसेच 'स्वच्छ भारत दिवस' म्हणूनही साजरा करण्यात येतो.