दरवर्षी २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह (National Wildlife Week)' पाळला जातो.

ठळक मुद्दे:

  • भारतातील जैवविविधतेचे रक्षण करणे तसेच वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह' पाळला जातो.
  • वन्यजीवांचे अस्तित्व तसेच जैवविविधता संवर्धन यांना चालना देण्यासाठी नैसर्गिक अधिवासांची परस्पर जोडणी वाढवणे या मुख्य उद्देशाने हा सप्ताह साजरा केला जातो.
  • २०२६ सालची ही या सप्ताहाची भारतातील ७२ वी आवृत्ती आहे.
  • २०२६ ची संकल्पना /थीम (Theme): 'निवासांची जोडणी, समृद्ध वन्यजीव (Connecting Habitats, Thriving Wildlife)' ही या सप्ताहाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • या सप्ताहाची सुरुवात १९५२ मध्ये झाली होती.
  • भारत सरकारमार्फत तेव्हा वन्यजीव संवर्धनाला चालना देण्यासाठी 'भारतीय वन्यजीव मंडळाची (Indian Board for Wildlife)' स्थापना करण्यात आली होती.
  • १९५५ मध्ये सुरुवातीला 'राष्ट्रीय वन्यजीव दिन' म्हणून हा उपक्रम राबवला गेला होता. 
  • १९५७ मध्ये याचा विस्तार करून 'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह' साजरा करण्यास सुरुवात झाली होती.