भारतात दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' (National Nutrition Week) पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- संपूर्ण भारतात उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, खाण्याच्या आरोग्यदायी सवयी तसेच पोषण यांबाबत जागरूकता निर्माण करणे या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी हा सप्ताह पाळला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- जागतिक स्तरावर १९७५ मध्ये 'अमेरिकन डायटेटिक असोसिएशन'ने (आताची 'ॲकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स') या उपक्रमाची सुरुवात केली होती.
- १९८२ पासून भारतामध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या (Ministry of Women and Child Development - MWCD) अंतर्गत असलेल्या 'अन्न आणि पोषण मंडळा'द्वारे (Food and Nutrition Board - FNB) राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे.
- १ ते ७ सप्टेंबर १९८२ या कालावधीत पहिला राष्ट्रीय पोषण सप्ताह आयोजित करण्यात आला होता.