• अलका मित्तल नुकत्याच 'ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC)' नूतन अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) बनल्या आहेत.

ठळक मुद्दे

  • महारत्न कंपनीत सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या आहेत.

  • त्या सुभाष कुमार यांची जागा घेतील.

ONGC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ONGC म्हणजेच Oil and Natural Gas Corporation अर्थात तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ होय.

  • स्थापना वर्ष: १९५६ साली ONGC ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे ONGC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.