-
कौशल्य विकास राज्यमंत्री श्री. राज कुमार सिंग यांच्यामार्फत गुरुग्राममध्ये ‘ऊर्जा क्षेत्रातील कौशल्य विकासासाठीच्या (Skill Development in Power Sector)’ भारताच्या पहिल्या उत्कृष्टता केंद्राचे (Centre of Excellence - CoE) उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
हरियाणाच्या गुरुग्राममधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेच्या (National Institute of Solar Energy) आवारामध्ये सदर उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
उत्कृष्टता केंद्राबाबत महत्वपूर्ण माहिती
-
सदरचे नवीन केंद्र राष्ट्रीय शिक्षण व युवा मंत्रालय, फ्रान्स सरकार आणि स्नायडर इलेक्ट्रिक यांच्या सहयोगाने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार मार्फत स्थापन करण्यात आले आहे.
-
भविष्यातील तंत्रज्ञानाची जाणीव ठेवून याची निर्मिती करण्यात आली आहे.