• भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स कार्यकारी गटाची (Employment Working Group - EWG) पहिली बैठक आभासी स्वरूपात संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली आहे.

  • कामगार व रोजगार सचिव श्री. अपूर्व चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

ब्रिक्सबाबत (BRICS) महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: BRICS म्हणजेच Brazil, Russia, India, China, and South Africa अर्थात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका होय.

  • स्थापना वर्ष: २००९ साली BRICS ची स्थापना करण्यात आली होती.

  • सध्याचे नेते: जैर बोलसोनारो (ब्राझील), व्लादिमीर पुतीन (रशिया), नरेंद्र मोदी (भारत), शी जिनपिंग (चीन) आणि सिरिल रामाफोसा (दक्षिण आफ्रिका) हे BRICS चे सध्याचे नेते आहेत.