नुकतीच मक्याची उत्पादकता आणि शाश्वतता बळकट करण्यासाठी हैदराबादमध्ये 'पहिली आंतरराष्ट्रीय मका परिषद २०२६' आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्दे:
- सदर मका परिषद ही २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे आयोजित करण्यात आली होती.
- मका संशोधन, उत्पादकता तसेच शाश्वत मूल्यसाखळी विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सदर परिषदेत एकत्र आले होते.
- परिषदेची संकल्पना: 'बदलत्या जगात अन्न, पशुखाद्य, चारा, इंधन आणि शाश्वततेसाठी मका क्रांती (Maize Revolution for Food, Feed, Fodder, Fuel and Sustainability - M4FS)' ही या परिषदेची संकल्पना होती.