• कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्यामार्फत बिडाडी मध्ये पालिकेच्या कचर्‍यावर आधारित ११.५ मेगावॅट ऊर्जेच्या वीजनिर्मिती केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • कर्नाटक ऊर्जा महामंडळ मर्यादितने (Karnataka Power Corporation Limited - KPCL) उभारलेला राज्यातील हा पहिला प्रकल्प आहे ज्यामुळे नगरपालिकेच्या ६०० टन कचऱ्याचे ११.५ मेगावॅट ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होईल.

  • जवळपास ८१ दशलक्ष रुपये खर्चून सदर वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.