दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी साजरा केला जाणारा 'आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस (International Red Panda Day)' २०२६ साली १९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे:

  • लाल पांडा ही सस्तन प्राण्यांची एक संकटग्रस्त प्रजाती असून सध्या त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.
  • त्यामुळे लाल पांडाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • पूर्व हिमालय आणि चीनमधील विविध भागांत लाल पांडा आढळतात. 
  • भारतातील सिक्कीम, दार्जिलिंगच्या टेकड्या आणि अरुणाचल प्रदेश यांचा यामध्ये समावेश होतो.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • हा दिवस 'रेड पांडा नेटवर्क (Red Panda Network)' या संस्थेद्वारे सुरू करण्यात आला होता.
  • सदर संस्था ही पूर्व हिमालयीन क्षेत्रातील वन्य लाल पांडा तसेच त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणासाठी पूर्णतः समर्पित आहे.
  • आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्यातील तिसऱ्या शनिवारी साजरा करण्यात येतो.
  • अधिवास नष्ट होणे तसेच मानवनिर्मित शिकार यांसारख्या समस्यांमुळे लाल पांडाच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.