संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'जागतिक शौचालय दिन (World Toilet Day)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच सर्वांसाठी सुरक्षित शौचालयांची उपलब्धता सुनिश्चित करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २०२६ ची या दिवसाची संकल्पना/ थीम (Theme): 'स्वच्छता आणि लिंग समानता (Sanitation and Gender Equality)' या विषयावर यंदाचा हा दिवस आधारित होता. 
  • अधिकृत घोषणावाक्य (Slogan): 'सुरक्षित शौचालये, समान भविष्य (Safe toilets. Equal futures.)' हे या दिवसाचे अधिकृत घोषणावाक्य होते.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • सिंगापूरस्थित दानशूर व्यक्ती जॅक सिम यांनी स्थापन केलेल्या 'वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन' (WTO) मार्फत २००१ मध्ये १९ नोव्हेंबर हा दिवस 'जागतिक शौचालय दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित कारायत आले होते.
  • २४ जुलै २०१३ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेमार्फत ठराव स्वीकारून दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे 'जागतिक शौचालय दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
  • पहिला जागतिक शौचालय दिन १९ नोव्हेंबर २०१३ रोजी पाळण्यात आला होता.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.