'संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेमार्फत (United Nations Educational, Scientific and Cultural Organization  - UNESCO)' दरवर्षी जगभरात नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी साजरा करण्यात येणारा 'जागतिक तत्त्वज्ञान दिन' यंदा १९ नोव्हेंबर साजरा करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे:

  • मानवी विचारांच्या विकासामध्ये, संस्कृतींच्या समृद्धीमध्ये तसेच व्यक्तींमधील बौद्धिक वाढीस प्रोत्साहन देण्यात तत्त्वज्ञानाच्या चिरंतन मूल्यावर प्रकाश टाकण्यासाठी UNESCO दरवर्षी हा दिवस साजरा करते.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • युनेस्कोने २००२ मध्ये आपल्या नियमित कार्यक्रमांतर्गत जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली होती.
  • युनेस्कोच्या कार्यकारी मंडळामार्फत मोरोक्कोच्या विनंतीनंतर २००५ मध्ये झालेल्या ३३ व्या सर्वसाधारण परिषदेने ठराव स्वीकारून नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार हा 'जागतिक तत्त्वज्ञान दिन' म्हणून अधिकृतपणे साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

UNESCO बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UNESCO म्हणजेच United Nations Educational, Scientific and Cultural Organization अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना होय.
  • स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९४५ रोजी UNESCO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स येथे UNESCO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UNESCO चे  १९४ सदस्य आणि १२ सहयोगी सदस्य देश आहेत.
  • सध्या कार्यरत महासंचालक: खालेद एल-एनी हे सध्या UNESCO च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.