दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जगभरात 'महिला उद्योजकता दिन (Women’s Entrepreneurship Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- महिला उद्योजकांचा गौरव करून, त्यांना सक्षम करून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- यंदा २०२६ साली या दिवसाची १३ वी आवृत्ती साजरी केली जात आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- या दिवसाची सुरुवात 'वुमेन्स आंत्रप्रिन्युअरशिप डे ऑर्गनायझेशन (Women’s Entrepreneurship Day Organization)' या अशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या सामाजिक उद्योजिका वेंडी डायमंड यांनी केली होती.
- सदर उपक्रम १४४ देश आणि ६५ महाविद्यालयांपर्यंत पोहोचला आहे.
- हा दिवस पहिल्यांदा १९ नोव्हेंबर २०१४ रोजी न्यूयॉर्क, अमेरिका येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला होता.