भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय एकात्मता दिन (National Integration Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- मुख्यतः राष्ट्रीय एकता व जातीय सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
- राष्ट्रीय एकात्मता सप्ताह' दरवर्षी १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जातो.
इंदिरा गांधी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद (सध्याचे प्रयागराज), उत्तर प्रदेश येथे झाला होता.
- त्यांनी १९६६ ते १९७७ आणि १९८० ते १९८४ या काळात भारताच्या तिसऱ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून काम केले होते.
- त्या भारताच्या इतिहासात दुसऱ्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या व्यक्ती आहेत.
- त्या 'आयर्न लेडी ऑफ इंडिया (Iron Lady of India)' म्हणून ओळखल्या जायच्या.
प्राप्त सन्मान / पुरस्कार:
- १९७१ - भारतरत्न
- १९८५ - मरणोत्तर लेनिन शांतता पुरस्कार (Lenin Peace Prize)