जगभरात दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी 'जागतिक मानवतावादी दिन' (World Humanitarian Day - WHD) पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • जगभरातील संकटग्रस्त लोकांना जीवनावश्यक मदत करणे, संरक्षण पुरवताना प्राण गमावलेल्या अथवा जखमी झालेल्या मानवतावादी कार्यकर्त्यांसह सर्व मानवतावादी कार्यकर्त्यांचा सन्मान करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस दरवर्षी पाळला जातो.
  • मानवतावादी कर्मचाऱ्यांचे संरक्षण तसेच आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे महत्त्व यांबाबतही हा दिवस जागरूकता निर्माण करण्याचे मुख्य कार्य करतो.
  • 'मानवतेसाठी कृती करा (#ActForHumanity)' हे जागतिक मानवतावादी दिनासाठीचे मोहिमेचे घोषवाक्य (Campaign Slogan) आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • ११ डिसेंबर २००८ रोजी ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने १९ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक मानवतावादी दिन' म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले.
  • पहिला जागतिक मानवतावादी दिन १९ ऑगस्ट २००९ रोजी साजरा करण्यात आला होता.
  • इराकच्या बगदाद येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयावर १९ ऑगस्ट २००३ रोजी आत्मघाती ट्रक बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये इराकमधील संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी असणाऱ्या सर्जिओ विएरा डी मेलो यांच्यासह २२ मानवतावादी कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.