उत्तराखंडमध्ये नुकताच भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव 'नोमॅडिक एलिफंट' (NOMADIC ELEPHANT) सुरू झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • उत्तराखंडमधील पिथोरागढ येथील 'फॉरेन ट्रेनिंग नोड (Foreign Training Node - FTN)' येथे भारत आणि मंगोलिया यांच्यातील वार्षिक संयुक्त लष्करी सराव 'नोमॅडिक एलिफंट २०२६' सुरू झाला आहे.
  • या सरावाची यंदाची १८ वी आवृत्ती असून ती २१ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.

'नोमॅडिक एलिफंट २०२६' सरावाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • या सरावात भारतीय लष्कर प्रामुख्याने 'अरुणाचल स्काउट्स'च्या बटालियनमधील - आणि मंगोलियन सशस्त्र दलांचे प्रत्येकी ४५ जवान सहभागी होणार आहेत.
  • हा सराव प्रामुख्याने सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण तसेच भारतीय व मंगोलियन सैन्यादरम्यान परस्पर कार्यक्षमता वाढवण्यावर केंद्रित असेल.
  • या सरावाच्या अभ्यासक्रमात घेराव आणि शोध मोहीम, सायबर सुरक्षा प्रशिक्षण तसेच ड्रोन आणि 'काउंटर-ड्रोन' प्रणालींचा वापर यांचा समावेश असणार आहे.