दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक जल निरीक्षण दिन (World Water Monitoring Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- पाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच जलस्रोतांचे निरीक्षण व संरक्षण करण्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी हा दिवस पाळला जातो.
दिवसाची पार्श्वभूमी:
- २००३ मध्ये 'अमेरिकन क्लीन वॉटर फाउंडेशन (American Clean Water Foundation - ACWF)' द्वारे या दिवसाची स्थापना एक जागतिक शैक्षणिक उपक्रम म्हणून करण्यात आली होती.
- १८ ऑक्टोबर २००३ रोजी पहिला 'जागतिक जल निरीक्षण दिन' साजरा करण्यात आला होता.
- या दिवसाच्या समन्वयाची जबाबदारी २००६ मध्ये ACWF कडून 'वॉटर एन्व्हायर्नमेंट फेडरेशन (WEF)' आणि 'इंटरनॅशनल वॉटर असोसिएशन (IWA)' कडे सोपवण्यात आली होती.
- कालांतराने २०१५ मध्ये 'अर्थइको इंटरनॅशनल'ने या कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी स्वीकारली होती.