दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'जागतिक बांबू दिन (World Bamboo Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • एक 'नूतनीकरणक्षम संसाधन' म्हणून सतत बदलणाऱ्या जगात बांबूचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्याच्या मुख्य उद्देशासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
  • २०२६ सालची संकल्पना: 'पुनरुज्जीवनशील भविष्यासाठी बांबू: निसर्गासोबत वाढ, निर्मिती आणि समृद्धी साधण्याचे जागतिक आवाहन (Bamboo for a Regenerative Future: A Global Call to Grow, Build and Prosper with Nature)' ही २०२६ सालची या दिवसाची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • २००९ मध्ये 'जागतिक बांबू संघटनेमार्फत (World Bamboo Organization - WBO)' सुरू करण्यात आलेला हा वार्षिक स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे.
  • बांबूचे महत्त्व तसेच मानव व पर्यावरणासाठी त्याचे असणारे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस आयोजित करण्यात येतो.