संयुक्त राष्ट्रांमार्फत (United Nations - UN) दरवर्षी १८ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन (International Equal Pay Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • समान मूल्याच्या कामासाठी समान वेतन मिळण्याला प्रोत्साहन देणे तसेच जागतिक स्तरावर लिंगाधारित वेतन तफावत कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना देणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस पाळण्यात येतो.
  • २०२६ सालची या दिवसाची ७ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • आइसलँड आणि 'इक्वल पे इंटरनॅशनल कोलिशन (EPIC)' च्या इतर सदस्यांमार्फत 'संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (United Nations Human Rights Council - UNHRC)' ४१ व्या अधिवेशनात २०१९ मध्ये समान वेतनाबाबतचा एक ठराव मांडला आणि 'आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन' साजरा करण्याची शिफारस करण्यात आली होती.
  • १८ डिसेंबर २०१९ रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने ठराव मंजूर करत १८ सप्टेंबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
  • १८ सप्टेंबर २०२० रोजी हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता.

UN बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्र होय.
  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी UN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका येथे UN चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या UN चे १९३ सदस्य देश आणि व्हॅटिकन सिटी व पॅलेस्टाइन हे २ निरीक्षक देश आहेत.
  • अधिकृत भाषा: UN मध्ये इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, रशियन आणि अरबी या ६ अधिकृत भाषा आहेत. 
  • सध्या कार्यरत महासचिव (Secretary-General): सध्या अँटोनिओ गुटेरेस हे UN च्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.