दरवर्षी १८ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक रजोनिवृत्ती दिन (World Menopause Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- रजोनिवृत्तीबद्दल (Menopause) जागरूकता निर्माण karane , महिलांचे आरोग्य जपणे आणि उपलब्ध आधार व उपचार पर्यायांची माहिती देणे या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी १८ ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'मध्यवयीन टप्प्यावर होणारी दीर्घकालीन वेदना (Chronic Pain At Midlife)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- 'इंटरनॅशनल मेनोपॉज सोसायटी (International Menopause Society)' ही १९७८ मध्ये स्थापन झालेली एक जागतिक अशासकीय संस्था आहे.
- IMS ने २००९ मध्ये 'जागतिक रजोनिवृत्ती दिना'ची सुरुवात केली होती.
- २००९ मध्ये पहिल्यांदा अधिकृतपणे 'जागतिक रजोनिवृत्ती दिन' साजरा करण्यात आला होता.