दरवर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या बुधवारी साजरा केला जाणारा 'जागतिक दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसीय रोग (World Chronic Obstructive Pulmonary Disease Day - COPD) दिन' यंदा २०२६ साली १८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे:
- COPD बाबत जागरूकता वाढविणे तसेच त्याचा जागतिक स्तरावर असणारा भार कमी करण्याच्या उपायांना प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
- २०२६ सालची या दिवसाची २५ वी आवृत्ती साजरी करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'उत्तम जीवनासाठी लवकर निदान आणि व्यवस्थापन. (Early Diagnosis and Management for a Better Life.)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- या दिवसाची सुरुवात WHO च्या सहकार्याने 'ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज (Global Initiative for Chronic Obstructive Lung Disease - GOLD)' द्वारे, COPD बद्दल जागरूकता, प्रतिबंध तसेच व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली होती.
- पहिला जागतिक COPD दिन २० नोव्हेंबर २००२ रोजी साजरा करण्यात आला होता.