भारतात दरवर्षी १८ नोव्हेंबर रोजी 'राष्ट्रीय निसर्गोपचार दिन (National Naturopathy Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- निसर्गोपचारांच्या माध्यमातून उत्तम आरोग्य पद्धती आणि सर्वांगीण मानवी कल्याणाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
- २०२६ रोजी ९ वा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन साजरा करण्यात येत आहे.
- २०२६ ची संकल्पना/ थीम (Theme): 'प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत (Prakritik Chikitsa, Swasth Bharat)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १८ नोव्हेंबर १९४५ रोजी महात्मा गांधी यांनी पुणे, महाराष्ट्र येथील 'ऑल इंडिया नेचर क्युअर फाउंडेशन ट्रस्टचे (All India Nature Cure Foundation Trust)' आजीवन अध्यक्षपद स्वीकारले होते.
- समाजातील सर्व घटकांपर्यंत निसर्गोपचार पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा विशेष निर्णय घेतला होता.
- २०१८ मध्ये आयुष मंत्रालयामार्फत १८ नोव्हेंबर हा दिवस 'राष्ट्रीय निसर्गोपचार दिन' म्हणून घोषित करण्यात आला होता.
- १८ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला होता.