जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO) दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day)' साजरा केला जातो.
ठळक मुद्दे:
- हा दिवस मुख्यतः रुग्णांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच आरोग्यसेवेतील सुरक्षा मानके सुधारण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशांसाठी पाळला जातो.
- २०२६ सालची संकल्पना / थीम (Theme): 'असंसर्गजन्य रोगांसाठी सुरक्षित काळजी (Safe care for Noncommunicable Diseases)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
- २०२६ सालचे घोषणावाक्य (Slogan): 'आयुष्यासाठी सुरक्षित आरोग्यसेवा! (Safe care for life!)' हे २०२६ सालचे या दिवसाचे घोषणावाक्य आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- २०१९ मध्ये ७२ व्या जागतिक आरोग्य सभेने जागतिक रुग्ण सुरक्षा दिनाची स्थापना 'रुग्ण सुरक्षेबाबत जागतिक कृती (Global Action on Patient Safety)' या WHA72.6 ठरावाद्वारे केली होती.
- पहिल्यांदा जागतिक रुग्ण सुरक्षा दिन १७ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा करण्यात आला होता.
WHO बाबत महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): WHO म्हणजेच World Health Organization अर्थात 'जागतिक आरोग्य संघटना' होय.
- स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
- दिवसाचे औचित्य: ७ एप्रिल या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन (World Health Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
- मुख्यालयाचे ठिकाण: जिनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland) येथे WHO चे मुख्यालय स्थित आहे.
- सदस्य देश: सध्या WHO चे १९४ सदस्य देश आहेत.
- सध्या कार्यरत महासंचालक: टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे सध्या WHO च्या कार्यरत महासंचालक पदावर विराजमान आहेत.