'आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन (International Day of the Intangible Cultural Heritage)' दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. 

ठळक मुद्दे:

  • जगातील वैविध्यपूर्ण जिवंत सांस्कृतिक वारशाचे रक्षण, जतन तसेच उत्सव साजरा करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
  • यंदाची २०२६ सालची या दिवसाची तिसरी आवृत्ती आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • UNESCO मार्फत नोव्हेंबर २०२३ मध्ये आपल्या ४२ व्या सर्वसाधारण परिषदेदरम्यान ठराव स्वीकारून १७ ऑक्टोबरला 'आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
  • हा दिवस पहिल्यांदा १७ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला होता.