जागतिक आरोग्य संघटनेमार्फत (World Health Organization - WHO) दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी जगभरात 'जागतिक गर्भाशय ग्रीवा कर्करोग निर्मूलन दिन (World Cervical Cancer Elimination Day)' साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • गर्भाशय ग्रीवा कर्करोग ही एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
  • २०२६ ची या दिवसाची संकल्पना/ थीम (Theme): 'एकत्रितपणे आपण गर्भाशय ग्रीवा कर्करोगाचे निर्मूलन करू शकतो (Together We Can Eliminate Cervical Cancer)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.

दिवसाची पार्श्वभूमी:

  • मे २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी गर्भाशय ग्रीवा कर्करोगाचे निर्मूलन करण्यासाठी जागतिक कृतीचे आवाहन केले होते.
  • २०२५ च्या मे महिन्यामध्ये ७८ व्या जागतिक आरोग्य सभेमार्फत ठराव स्वीकारला जाऊन १७ नोव्हेंबर हा 'जागतिक गर्भाशय ग्रीवा कर्करोग निर्मूलन दिन' म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले.