'भारतीय अपस्मार संघटना (Indian Epilepsy Association - IEA)' द्वारे दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय अपस्मार दिन (National Epilepsy Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- अपस्माराबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच सार्वजनिक शिक्षणाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण भारतात हा दिवस साजरा केला जातो.
- २०२६ सालच्या या दिवसाची संकल्पना / थीम (Theme: 'अपस्मारविषयक प्रतिज्ञा (The Epilepsy Pledge)' ही या दिवसाची २०२६ सालची थीम आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- मध्य प्रदेशातील इंदूर येथे डिसेंबर १९९० मध्ये झालेल्या आपल्या सर्वसाधारण सभेत IEA ने दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
- भारतीय न्यूरोलॉजिस्ट डॉ. एडी भारुचा तसेच डॉ. पिलू भारुचा यांनी अपस्माराबद्दल जागरूकता आणि सार्वजनिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
- जांभळी रिबन मोठ्या प्रमाणावर अपस्माराच्या जागरूकतेशी संबंधित असून लॅव्हेंडर हे फूल अपस्माराच्या जागरूकतेशी जोडलेले एक प्रतीकात्मक फूल आहे.