'आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन (International Students’ Day)' दरवर्षी १७ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- १९३९ मध्ये चेकोस्लोव्हाकियामध्ये नाझी आक्रमणाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे धैर्य तसेच त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
- यंदा २०२६ सालचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा ८६ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येत आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- हा दिवस सर्वप्रथम १७ नोव्हेंबर १९४१ रोजी लंडन, युनायटेड किंगडम (यूके) येथे 'इंटरनॅशनल स्टुडंट्स कौन्सिल'द्वारे साजरा करण्यात आला होता.
- १७ नोव्हेंबर १९३९ रोजी नाझी सैन्याने चेकोस्लोव्हाकियामधील विद्यापीठे बंद केली. यात ९ विद्यार्थी नेत्यांची हत्या करतानाच १,२०० हून अधिक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती.